Ad will apear here
Next
पुण्यातील डॉ. रोहन कुलकर्णी यांना जागतिक पातळीवरील ‘स्टेम सेल्स तरुण संशोधक’ पुरस्कार


पुणे :
स्टेम सेल्स अर्थात मूळ पेशींवर संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना दिला जाणारा जागतिक पातळीवरील स्टेम सेल्स यंग इन्व्हेस्टिगेटर अॅवॉर्ड  (तरुण संशोधक पुरस्कार) या वर्षी डॉ. रोहन कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. 

रक्त निर्माण करणाऱ्या मूळ पेशींवरील अत्यंत महत्त्वाच्या संशोधनासाठी डॉ. रोहन कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रशस्तिपत्रक आणि दहा हजार डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार व्हीले पब्लिशिंग हाउस व अल्फा मेड प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. जागतिक पातळीवर महत्त्वाचे ठरलेले हे संशोधन डॉ. रोहन कुलकर्णी यांनी पुण्यातील राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स) येथे केले आहे.

शरीरातील मूळ पेशींवरील संशोधन कार्यासाठी वाहिलेल्या ‘स्टेम सेल्स’ या नामांकित नियतकालिकामध्ये डॉ. रोहन कुलकर्णी यांचा या विषयावरील शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. त्याचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शरीरामध्ये रक्तनिर्मितीचे महत्त्वाचे कार्य रक्ताच्या मूळ पेशी करत असतात. या पेशींचा उपयोग कर्करोग व इतर दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी केला जातो. वृद्ध लोकांमधील या पेशींची कार्यक्षमता कमी असल्याने उपचारांसाठी त्या निरुपयोगी ठरतात. पुनरुज्जीवनाद्वारे मूळ पेशींकरिता अधिक दाते  उपलब्ध करून अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचार मिळावेत, असे सदर संशोधनाचे उद्दिष्ट होते. या मूळ पेशी पुनरुज्जीवनासाठी केलेल्या संशोधनामुळे बोन मॅरो ट्रान्स्प्लांट सुलभ होण्यास साह्य होणार आहे. 

डॉ. रोहन कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण दौंड येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रात संशोधन करून पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर ते पुढील संशोधनाकरिता फ्रान्स येथे गेले होते. सध्या ते अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करीत आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZXDCJ
Similar Posts
कल्पनेला पडद्यावर साकारणारे ‘इल्युजन इथेरिअल’ पुणे : चित्रपटाच्या कथेची मांडणी, सादरीकरण याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आज व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्स अशा आधुनिक तंत्रज्ञानालासुद्धा आले आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक या आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देत असल्याचे दिसते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या लाल कप्तान, हिरकणी, फत्तेशिकस्त या चित्रपटांच्या ‘व्हीएफएक्स’ची सर्वत्र मोठी चर्चा होती
‘No.. No... चेहऱ्याला हात लावू नका;’ करोना प्रतिबंधासाठी कम्प्युटर/लॅपटॉप देणार इशारा; तरुणाचे अॅप करोना विषाणूने सध्या जगभरात सगळीकडे हाहाकार माजवला आहे. त्यावर अद्याप औषध नसल्याने प्रतिबंधात्मक काळजीच कसोशीने घ्यायच्या सूचना अगदी जागतिक आरोग्य संघटनेपासून (WHO) सगळ्याच महत्त्वाच्या संस्था देत आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्याचा एक उपाय म्हणून हात वारंवार धुवा आणि चेहऱ्याला सतत हात लावू नका, अशाही सूचना
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या
एक लिटर पेट्रोलमध्ये १६० किलोमीटर; पुण्याच्या अथर्वने विकसित केली इलेक्ट्रिक-पेट्रोल हायब्रिड बाइक पुणे : एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल १६० किलोमीटर धावणारी बाइक! विश्वास बसत नाही ना; पण हे खरे आहे. अथर्व राजे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने पेट्रोलची बचत करण्यासाठी जुन्या बाइकवर संशोधन करून ही अनोखी इलेक्ट्रिक पेट्रोल हायब्रिड बाइक विकसित केली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या खर्चात बचत होईल, शिवाय ती पर्यावरणपूरकही असेल, असे त्याचे म्हणणे आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language